शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अकोला : इलियास हत्याकांडात पाच आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:14 AM

अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या  इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या  केल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक केली आहे. तर त्याच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेलची नववर्षाच्या पूर्वसंध्येला हत्यात्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी केली निर्घृण हत्याहत्याकांडातील पाच आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या  इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या  केल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक केली आहे. तर त्याच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेला इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल (३५, रा. शंकर नगर) हा रविवारी रात्री दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता. १७ वर्षाच्या मुलीसह दोन्ही मुलींचा ताबा घेण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तो पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला; मात्र रात्रीच्या सुमारास सासरा शेख मोहम्मद शेख रन्नू, सासू शयदाबी शेख मोहम्मद, साळू गुलाम चांद गुलाम रियाझ, पत्नी शबाना परवीन इलीयास पटेल या चार जणांसह साळू गुलाम चांदचे मित्र शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस यांनी इलीयासची हत्या करून मृतदेह  नेऊन टाकला होता. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ अमीर हसन पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मो. शेख रन्नू (सासरा), शाहिदाबी शेख मोहम्मद (सासू), गुलाम चाँद गुलाम रियाज (साडू), शबाना परवीन इलियास (पत्नी) व शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याला मृतावस्थेत रेल्वेट्रॅकजवळ नेऊन टाकण्यासाठी गुलाम चांद याचे मित्र शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस  यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शनिवारपयर्ंत पोलीस कोठडीतठेवण्याचे आदेश बजाविलेत. दरम्यान, त्याच्या पत्नीची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.-

टॅग्स :Akola cityअकोला शहरMurderखूनArrestअटक