शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला आॅइल इंडस्ट्रिजच्या जागेवरची मालकी ‘खासगीच’!

By admin | Updated: April 17, 2017 01:57 IST

महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश: वखारियांच्या सात याचिका खारीज

अकोला : अकोला आॅइल इंडस्ट्रिजची उमरी येथील तीन सर्व्हे क्रमांकात असलेली ४८ एकर २० गुंठे जागा ही खासगी मालकीची असल्याचा निर्वाळा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे. याप्रकरणी कोणत्याही पुराव्याची कागदपत्रे सादर न केल्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २९ सप्टेंबर २०१२ रोजी पारित केलेल्या आदेशाचे पुनर्विलोकन व्हावे, या मागणीसाठी प्रदीप वखारिया यांनी श्रीकांत पटेल, मनोज अपूर्वा, राजाभाऊ देशमुख यांच्यामार्फत अपील दाखल केले होते. जमीन ही शासनाच्याच मालकीची असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने ते फेटाळण्यात आले. तसेच याप्रकरणी १५६(३) नुसार कारवाई व्हावी, यासाठी प्रदीप वखारिया यांनी न्यायालयात व्ही.पी. नंद, गोपीकिशन बाजोरिया, शुभांगी देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार न्यायालयाच्या आदेशाने रामदासपेठ पोलिसांनी चौकशी करून कनिष्ठ न्यायालयात वखारिया यांच्याविरुद्ध अभियोगासह बी समरी दाखल केली आहे. त्यामध्येही वखारिया यांनी उमरी येथील सर्व्हे क्रमांक ६०, ६१, ६२ मधील ४८ एकर २० गुंठे जागा शासनाची असल्याबाबत पुरावे सादर केले नसल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वीही वखारिया यांनी प्रकाश बोदडे यांच्यामार्फत ही जमीन शासकीय असून, त्यावर अकोला नगर परिषदेने प्रस्तावित आरक्षणाबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंग जाधव यांनी करून न्यायालयात बी समरी दाखल केली होती. न्यायालयाने ती मंजूरही केली होती. त्यानंतर वखारिया यांनी शासनाकडेही तक्रारी केल्या. त्यावर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचा अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर शासनाने वखारिया खोट्या तक्रारी करून शासनाचा वेळ वाया घालवत असल्याचे नमूद करीत वखारिया यांच्याविरुद्ध कोणत्या कायद्याने कारवाई करता येईल, याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडून मागविला. अकोला आॅइल इंडस्ट्रिजच्या कामगारांच्या थकीत रकमेसाठी वखारिया यांनी उच्च न्यायालयात पाच याचिका दाखल केल्या. न्यायालयाने त्या सर्व फेटाळून लावत वखारिया यांना २० हजारांचा दंडही ठोठावला. त्यानंतर वखारिया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ३० आॅगस्ट २०१६ रोजीच्या आदेशात त्या जागेतून जाणारा खरप रस्ता सध्या अस्तित्वात नाही. १९६४ मध्ये त्या रस्त्याची देवाण-घेवाण करण्यात आली. अकोला आॅइल इंडस्ट्रिजने शासनाला रस्त्याच्या बदल्यात स्वत:च्या मालकीची ६५,५९९ चौ. फूट जागा दिली होती. शासनाने त्या बदल्यात अकोला आॅइल इंडस्ट्रिजला ४९३८१ चौ. फूट जागेचा ताबा दिला होता. शासनाने व न्यायालयाने अनेक वेळा ही जागा खासगी मालकीची असल्याचे आदेश दिले आहेत. तरीही वखारिया मुद्दामपणे शासन, न्यायालय आणि माध्यमांची दिशाभूल करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मनपाच्या विकास आराखड्यात समावेशतक्रारीत नमूद प्रस्तावित आरक्षित भूखंड क्रमांक १०४, १०४ अ, १०५ हे तत्कालीन नगर परिषदेने विहित काळात भूसंपादनाची कारवाई न केल्याने १९९७ रोजी रद्द केले होते. तसेच अकोला महापालिकेने ही जागा निवासी उपयोगाकरिता २००४ मध्ये मंजूर केलेल्या विकास आराखड्यात दाखवलेली आहे. त्यामुळे या जागेवर मनपाची रीतसर परवानगी घेऊन शेकडो लोकांनी निवासासाठी घरे बांधली आहेत.