शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील शेतकरी धडकले आकोटच्या कृषी अधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:29 IST

चोहोट्टा बाजार : कुटासा परिसरातील गावामधील पिकांचे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना  निवेदन दिले.

ठळक मुद्देबोंडअळीने नुकसान झालेल्या कपाशीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.कृषी अधिकाऱ्यांना सोपविले मागण्यांचे निवेदन.

चोहोट्टा बाजार : कुटासा सर्कलअंतर्गत येणाºया सर्वच गावांमध्ये कपाशी या नगदी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून हाती आलेले नगदी पिकही खराब होताना दिसून येत आहे. बोंडअळीच्या अस्मानी संकआमुळे शेतकरी पुरता निराशेत सापडला आहे तरी कुटासा परिसरातील गावामधील पिकांचे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना  निवेदन दिले.कुटासा परिसरातील रोहणखेड, तरोडा, मरोडा, कावसा, कुटासा, दिनोडा, गरसोळी, पातोंडा, रेल, धारेल, गिरजापूर, करतवाडी, जऊळखेड, दनोरी, पनोरी आदी गावामध्ये कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात आहे. अचानक आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीतून कापूस किडलेल्या अवस्थेत पिवळा झालेला व अर्धा कापूस नष्ट झालेला अशा प्रकारचा कापूस येत आहे तरी शासनाने कुटासा परिसरातील सर्वच गावामध्ये सर्व्हे व पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके, सेवा सहकारी सोसायटी सभापती राजू पाटील झटाले, अमोल काळणे, प्रतापराव गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, पद्माकर जायले, दत्ता साबळे, रवी वानखडे, अंकुर गावंडे, संजय मालवे, मंगेश केवट, मिलिंद झामरे, प्रशांत भगत, अजय रेलकर, श्याम चतार, भूषण झामरे, वैभव झामरे, अर्जुन मालाणी, शुभम थोरात, विठ्ठल सदाफळे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षºया आहेत. (वार्ताहर)

- बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना  मोठा फटका बसत आहे. कपाशीमध्ये ७५ टक्के बोंड सडलेल्या अवस्थेत आहेत. कपाशीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना प्रतिएकर ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.- कपील ढोके,संभाजी ब्रिगेड.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी