पुन्हा भरणार 'अकोल्याची जत्रा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST2021-06-09T04:23:25+5:302021-06-09T04:23:25+5:30

अकोला - 'अकोल्याची जत्रा' ह्या फेसबुक पेजवरील लाइव्ह कार्यक्रमाचे आणखी एक सत्र आयोजित केले असून महाराष्ट्रातील नामांकित प्रतिभावंत यानिमित्ताने ...

'Akola fair' to be held again | पुन्हा भरणार 'अकोल्याची जत्रा'

पुन्हा भरणार 'अकोल्याची जत्रा'

अकोला - 'अकोल्याची जत्रा' ह्या फेसबुक पेजवरील लाइव्ह कार्यक्रमाचे आणखी एक सत्र आयोजित केले असून महाराष्ट्रातील नामांकित प्रतिभावंत यानिमित्ताने रसिकांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या नैराश्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अकोल्यातील विविध क्षेत्रांतील मंडळींनी हे आयोजन केले आहे.

संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत हे कार्यक्रम हाेणार असून, ९ जून रोजी अकोल्यातील ज्येष्ठ लोककलावंत वसंत मानवटकर यांची मुलाखत नयना देशमुख घेणार आहेत. १० जूनला प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख हे काव्यगायन करणार आहेत. ११जूनला सुप्रसिद्ध गझलगायिका भाग्यश्री पांचाळे यांची 'प्राणात चंद्र ठेवू' ही मैफल रंगणार आहे. १२ जूनला लोककवी प्रशांत मोरे यांच्या कवितांची मैफल बहरणार आहे, तर समारोपीय कार्यक्रम म्हणून नागपूरचे ख्यातनाम कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर हे 'सखे साजणी' हा कविता आणि किस्स्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमांचा रसिकांनी सहपरिवार अवश्य आनंद घ्यावा, असे आवाहन अकोल्याच्या जत्रेतील राजश्री देशमुख, नयना देशमुख, किशोर बळी, अजय गावंडे, डॉ.आर.बी.हेडा, ॲड.मोतीसिंग मोहता, विजय कौसल, संध्या देशमुख, देवश्री ठाकरे, हेमलता वारोकार,नरेंद्र चिमणकर, अतुल पवणीकर, श्याम ठक, विद्या राणे, चंद्रकांत झटाले आदींनी केले आहे.

Web Title: 'Akola fair' to be held again