शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : धामना लुटमारीतील आठ आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:43 IST

अकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा पळविला होता मोबाइल व रोखदोन साक्षीदार फितूर, तीन कायमसात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.धामना नदीपात्रात याच गावातील रहिवासी संतोष शेषराव भगत, गोपाल मुदगल भांबेरे, वैभव गोपाल भांबेरे, सुखदेव भिकाजी भांबेरे, श्याम मुदगल भांबेरे, गजानन रामकृष्ण शेळके, ज्ञानेश्‍वर श्रीराम पाकदुने व तुळशीराम नागोराव पाक दुने हे एका तवेरा वाहनामध्ये २६ नोव्हेंबर २0१३ रोजी पूर्णा नदीपात्रात घातक शस्त्रास्त्र घेऊन बसलेले होते. या आठ आरोपींनी धामना गावातील नागरिकांना मारहाण करीत लुटमार केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. उरळ पोलीस पूर्णा नदीपात्रात जाताच यातील आरोपी संतोष भगत याने एका पोलीस कर्मचार्‍याचा मोबाइल व रोख रक्कम घेऊन पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या सात साथीदारांनी पोलिसांना शस्त्रांचा धाक दाखवून अडवून ठेवले. त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांना ईल शिवीगाळ करीत धाक दाखविला. पोलीस घातक शस्त्रांपुढे हतबल ठरल्याने आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात सदर आठ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२, ३५३, १८६ व ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एन. इंगोले यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील पाच साक्षीदार तपासले. यामधील दोन साक्षीदार फितूर झाले; मात्र तीन पोलीस कर्मचारी असलेले साक्षीदार साक्षीवर कायम होते. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संतोष भगत या आरोपीस कलम ३९२ अन्वये पाच वर्षांची शिक्षा सुनावली, तर दंडही ठोठावला. इतर सात आरोपींना कलम १८६, ३५३, ४२७ अन्वये प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. आशीष पुंडकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCourtन्यायालयCrimeगुन्हाjailतुरुंग