शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:48 IST

अकोला पूर्व मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार हरिदास भदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, पक्षाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघात बंडाळी रोखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर निर्माण झाले आहे.अकोला पूर्व मतदारसंघाचे सलग दहा वर्षे आमदार म्हणून राहिलेले आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले माजी आमदार भदे यांना पुन्हा या मतदारसंघातून ‘वंचित’ने संधी दिली आहे.मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे आणि काँग्रेसचे विवेक पारसकर यांच्यात तिरंगी लढत रंगणार असली तरी, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांची उमेदवारी कायम राहिल्यास मतदारसंघातील निवडणूक रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार भदे आणि माजी मंत्री डॉ. भांडे आमने-सामने येणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षात कुठलीही बंडाळी झालेली नाही. त्यामुळे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विवेक पारसकर यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी त्यांनी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येत उमेदवारी अर्ज दाखल करुन लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती आघाडी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण करणारी होती. या पृष्ठभूमीवर विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्यासमोर काँग्रेस आणि वंचित या पक्षाच्या उमेदवारांचे तगडे आव्हाण उभे ठाकले आहे.

टॅग्स :akola-east-acअकोला पूर्वMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी