अकोला : कुत्रा चावल्याने उमरीतील इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 02:04 IST2018-02-26T02:04:41+5:302018-02-26T02:04:41+5:30
अकोला : उमरी परिसरातील रहिवासी नारायण परशुराम इंगळे यांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे.

अकोला : कुत्रा चावल्याने उमरीतील इसमाचा मृत्यू
ठळक मुद्देनारायण इंगळे यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला
अकोला : उमरी परिसरातील रहिवासी नारायण परशुराम इंगळे यांना कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. नारायण इंगळे यांना २२ फेब्रुवारी रोजी उमरी परिसरातील एका कॉलेजजवळ पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेल्या इंगळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्याच्या चाव्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.