शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अकोला : तापडिया नगरात २.५0 लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:57 AM

अकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

ठळक मुद्देचोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर केला हात साफ सव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तापडिया नगरातील निखिल भोंडे यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी सुमारे २.५0 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या तापडिया नगरामध्ये इंद्रा निखिल भोंडे कुटुंबीय वास्तव्यास आहे. अपघाताच्या कारणामुळे निखिल भोंडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गत तीन दिवसांपासून दाखल आहेत. त्यामुळे घरी कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूपकोंडा तोडून घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम लंपास केली. सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्वर शेख हे  ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरातील सोन्याचे  मंगळसूत्र, हार, टॉप्स, दागिने असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती त्यांनी दिली. या चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन