शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अकोला : सफाई कामाचे खासगीकरण नको - राम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:47 AM

अकोला : महापालिकांच्या आस्थापनेवर ताण येत असल्याच्या सबबीखाली अनेक ठिकाणी साफसफाईच्या कामांचा कंत्राट दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेत समावेश असणार्‍या साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करणे योग्य ठरणार नसल्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी स्पष्ट केले. सोमवारी मनपातील सफाई कर्मचार्‍यांच्या संदर्भात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राम पवार अकोल्यात दाखल झाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ठळक मुद्देसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष पवार यांचे पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकांच्या आस्थापनेवर ताण येत असल्याच्या सबबीखाली अनेक ठिकाणी साफसफाईच्या कामांचा कंत्राट दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेत समावेश असणार्‍या साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करणे योग्य ठरणार नसल्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी स्पष्ट केले. सोमवारी मनपातील सफाई कर्मचार्‍यांच्या संदर्भात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राम पवार अकोल्यात दाखल झाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरांमधील स्वच्छतेची कामे करताना सफाई कर्मचार्‍यांना जोखीम पत्करावी लागते. त्यांना सतत अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांसाठी शासनाने विविध योजना लागू केल्या. लाड-पागे कमिटीच्या शिफारशी लागू केल्या असल्या, तरी सदर योजना व कमिटीच्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी सांगितले. अकोला शहराची लोकसंख्या पाहता मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत ७४८ सफाई कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असून, मनपाला किमान अडीच हजार सफाई कर्मचार्‍यांची गरज असल्याची माहिती राम पवार यांनी दिली. आर्थिक उत्पन्नाअभावी सफाई कर्मचार्‍यांचे तीन-तीन महिन्यांचे वेतन थकीत राहते. सफाई कर्मचार्‍यांसाठी ‘श्रम साफल्य’ योजनेंतर्गत घर बांधणे अपेक्षित असून, प्रशासनाने ही योजना सुरू करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या व त्यावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाचा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनपा उपायुक्त सुरेश सोळसे, लेखाधिकारी एम.बी. गोरेगावकर, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी पी.बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निंधाने, अरुण सारवान, गुरु सारवान, सोनू पचेरवाल यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

१0 वर्षांपर्यंत आयोगाचे गठनच नाही!तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात सफाई कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी सफाई कर्मचारी आयोगाचे गठनच करण्यात आले नव्हते. तत्कालीन आघाडी सरकारला आयोगाचा विसर पडला होता. वर्तमान भाजप सरकारला मात्र सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांची जाण असल्यामुळेच त्यांनी आयोगाचे गठन केल्याचे अध्यक्ष राम पवार यांनी सांगत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका