शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट!

By atul.jaiswal | Updated: May 2, 2018 14:19 IST

अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे.

ठळक मुद्दे चित्रिकरण गोपालखेड गावात झाले असून, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व छायाचित्रण संघदास वानखडे यांनी केले आहे. या चित्रपटात हर्षल जाधव, निशांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. मोबाइल कॅमेराद्वारे लघुपट बनविण्याचा हा राज्यातील दुसरा प्रयत्न असल्याचा दावा संघदास वानखडे यांनी केला आहे.

- अतुल जयस्वालअकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. संघदास भगवान वानखडे असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांनी मोबाइल फोनच्या कॅमेराद्वारे हा २२ मिनिटांचा लघुपट तयार केला आहे.मुलांना जे आवडते, त्या आवडीच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्याचा परिणाम चिरकाल टिकतो, असा संदेश ‘सालस’ नामक या लघुपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लघुपटाचे चित्रिकरण गोपालखेड गावात झाले असून, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व छायाचित्रण संघदास वानखडे यांनी केले आहे. शाळेला नेहमी दांडी मारणारा विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रेमळ वागणुकीतून शाळेकडे कसा वळतो, हे दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटात करण्यात आल्याचे संघदास वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या चित्रपटात हर्षल जाधव, निशांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. शिवाय माजी जि.प. सदस्य प्रदीप देशमुख, शाळेतील शिक्षिका जयश्री जोशी, मीनाक्षी आपटे, धनराज ठाकरे, श्याम देवकर व संघदास वानखडे यांनीही काम केले आहे. या लघुपटासाठी गोपालखेड केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.शिक्षकाने बनविलेला राज्यातील दुसराच लघुपटएखाद्या शिक्षकाने शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोबाइल कॅमेराद्वारे लघुपट बनविण्याचा हा राज्यातील दुसरा प्रयत्न असल्याचा दावा संघदास वानखडे यांनी केला आहे. यापूर्वी सांगली येथील प्रवीण डाकरे या शिक्षकाने २०१७ मध्ये ‘लेजीम’नावाचा लघुपट बनविला होता. संघदास वानखडे यांनी बनविलेला हा लघुपट ‘कोकण फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, चिपळूण, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित ‘इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’साठी हा लघुपट पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाTeacherशिक्षक