अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के!

By Admin | Updated: May 30, 2017 20:30 IST2017-05-30T20:30:30+5:302017-05-30T20:30:30+5:30

यावर्षीही टक्केवारीत मुलींचीच बाजी

Akola District results in 89.81 percent! | अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के!

अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३० मे राजी घोषित करण्यात आला असून, अकोला जिल्ह्याचा ८९.८१ टक्के आहे. यावर्षीही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २६ हजार ९७८ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २६ हजार ९६१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. यापैकी २४ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८९.८१ अशी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३०३५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ९,३१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११,१९६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण २४ हजार २१५ विद्यार्थ्यांमध्ये १२,७१९ मुले व ११,४९६ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०१ तर मुलींची टक्केवारी ९३.१४ अशी आहे.

Web Title: Akola District results in 89.81 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.