अकोला जिल्ह्याला कोविड लसीचे ४० हजार डोस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 10:51 IST2021-07-03T10:49:03+5:302021-07-03T10:51:07+5:30

Corona Vaccine : यामध्ये कोविशिल्डचे ३१ हजार ६००, तर कोव्हॅक्सिनचे ८ हजार ५०० डोसचा समावेश आहे.

Akola district receives 40,000 doses of Corona Vaccine | अकोला जिल्ह्याला कोविड लसीचे ४० हजार डोस प्राप्त

अकोला जिल्ह्याला कोविड लसीचे ४० हजार डोस प्राप्त

ठळक मुद्देकोविशिल्ड ३१,६००, तर कोव्हॅक्सिनचे ८,५०० डोस उपलब्ध कोविड लसीकरणाचा वेग वाढणार

अकोला: जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर, कोविड लसीकरण मोहिमेची गती वाढली आहे. मात्र, दुसऱ्या डोससाठी लसीची कमतरता भासत हाेती. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यासाठी कोविड लसीचे ४० हजार १०० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोविशिल्डचे ३१ हजार ६००, तर कोव्हॅक्सिनचे ८ हजार ५०० डोसचा समावेश आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताच, डेल्टा प्लसच्या निमित्ताने जिल्ह्याला कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यापासून बचावासाठी, तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू झाल्याने ही गती वाढली. मात्र, लसीचे मर्यादित डोस उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या वाढत्या गतीलाही मर्यादा येत आहेत. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग काही प्रमाणात थंडावला होता. मात्र, शुक्रवारी जिल्ह्याला लसीचे ४० हजार १०० डोस प्राप्त झाल्याने मोहिमेचा वेग पुन्हा वाढणार आहे.

विभागाला मिळाले २ लाख १४ हजार डोस

अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीचे डोस उपलब्ध झाले. यामध्ये कोविशिल्डचे १ लाख ४७ हजार, तर कोव्हॅक्सिनचे ६७ हजार ३६० डोस प्राप्त झाले आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्यामार्फत विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण करण्यात आले.

 

जिल्हा निहाय वितरित लसीचे डाेस

जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन

अकोला - ३१,६०० - ८,५००

अमरावती - ३३,१०० - १३,५००

बुलडाणा ३६०- १८,३०० - १६,८००

वाशिम - १९,६०० - १६,७६०

यवतमाळ - ४४,४०० - ११,८००

--------------------------------

एकूण - १,४७,००० - ६७,

Web Title: Akola district receives 40,000 doses of Corona Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.