अकोला जिल्ह्याचा आराखडा १५९ कोटींवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:26 IST2019-02-15T13:25:40+5:302019-02-15T13:26:00+5:30

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)मार्फत मंजूर करण्यात आला

 Akola District Plan 159 Crore! | अकोला जिल्ह्याचा आराखडा १५९ कोटींवर!

अकोला जिल्ह्याचा आराखडा १५९ कोटींवर!

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)मार्फत मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये अतिरिक्त ३७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा आता १५९ कोटींवर पोहोचला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १२१ कोटी ९२ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला होता; परंतु विविध यंत्रणांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील विकास कामांसाठी अतिरिक्त २४१ कोटी १५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गत २२ जानेवारी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुषंगाने गुरुवार, १४ फेबु्रवारी रोजी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी अतिरक्त ३७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या १५९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यामुळे १२१ कोटींचा असलेला जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा आता १५९ कोटी रुपयांचा झाला आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

अतिरिक्त निधीची अशी करण्यात आली होती मागणी!
क्षेत्र निधी                                                           (लाखात)
कृषी व संलग्न सेवा                                             २१०१.६८
सामाजिक व सामूहिक सेवा                                १०५३६.८५
पाटबंधारे आणि पूरनियंत्रण                               ३३३२.२३
ऊर्जा                                                                   २०२९.३५
उद्योग व खाण                                                   २०.००
परिवहन                                                              ५९१४.००
सामान्य आर्थिक सेवा                                         १८१.४०
.....................................................................................
एकूण                                                                  २४११५.५१

 

Web Title:  Akola District Plan 159 Crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.