अकोला जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता
By Admin | Updated: November 13, 2014 01:14 IST2014-11-13T01:14:33+5:302014-11-13T01:14:33+5:30
गत २४ तासांत अकोला शहर व परिसरात १४ मिमी पावसाची नोंद.

अकोला जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता
अकोला : गत २४ तासांत अकोला शहर व परिसरात १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या चोवीस तासांत पुन्हा पावसाची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गुडधी, यावलखेड,सांगळूद, बोंदरखेड, पांढरी, बाभूळगाव, शिवणी, शिवर, कृषी विद्यापीठ परिसरासह तालुका, जिल्हाभरात ठिकठिकाणी पाऊस झाला. शहर परिसरात झालेल्या पावसाची नोंद कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान विभागाने केली असून, १४ मिमी अशी ही नोंद झाली आहे.
दरम्यान, बुधवारचे कमाल तापमान ३२.४ अंश, तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सीअस होते. सूर्यप्रकाशाचे तास २.८, तर हवेचा वेग प्रतितास २.३ कि.मी. एवढा होता. आद्र्रता सकाळी ८९, तर दुपारी ३८ टक्के होती. बाष्पीभवन ६.0 मिमी या प्रमाणात झाले आहे.