अकोला जिल्हय़ाला मिळाला सातशे मेट्रिक टन युरिया!

By Admin | Updated: September 10, 2014 01:21 IST2014-09-10T01:21:56+5:302014-09-10T01:21:56+5:30

तालुका स्तरावर युरीया खताचे वितरण, लवकरच मिळणार उर्वरित साठा.

Akola district got seven hundred metric tons urea! | अकोला जिल्हय़ाला मिळाला सातशे मेट्रिक टन युरिया!

अकोला जिल्हय़ाला मिळाला सातशे मेट्रिक टन युरिया!

अकोला : या खरीप हंगामासाठी जिल्हय़ाला २९00 मेट्रिक टन युरियाची गरज आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत किमान १६ हजार ५00 मेट्रिक टन युरिया हवा होता. प्रत्यक्षात १२ हजार ४७३ मेट्रिक टन युरिया मिळाल्याने जिल्हय़ात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे; पण सोमवारी जिल्हय़ासाठी ७00 मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून, या युरियाचे तालुका स्तरावर वितरण करण्यात आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. आरसीएफ या कंपनीचा सातशे मेट्रिक टन युरियाचा साठा जिल्हय़ाला उपलब्ध झाला आहे. सोमवारी आलेल्या युरियामधून अकोला तालुक्याला १२0 मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले असून, आकोट तालुक्याला १२५ मेट्रिक टन युरिया उपलब्ध करू न देण्यात आला आहे. तेल्हारा तालुक्याला १२0, बाळापूर १0५, मूर्तिजापूर १0५, पातूर ६५ तर बाश्रीटाकळी तालुक्याला ४५ मेट्रिक टन युरियाचे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान उर्वरित सर्व युरियाचा साठा येत्या पंधरवड्यात टप्प्या-टप्प्याने उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.

Web Title: Akola district got seven hundred metric tons urea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.