अकोला जिल्ह्यातील वनविभाग वार्‍यावर!

By Admin | Updated: July 12, 2014 01:56 IST2014-07-12T01:41:35+5:302014-07-12T01:56:26+5:30

राज्यातील १७ अधिकार्‍यांच्या बदल्या

Akola district forest department war! | अकोला जिल्ह्यातील वनविभाग वार्‍यावर!

अकोला जिल्ह्यातील वनविभाग वार्‍यावर!

अकोला: अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही.ए. धोकटे यांची बदली झाली असून, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पद एक वर्षांपासून रिक्त आहे. तसेच वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुटीवर आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या तीनही पदावरील अधिकारी सध्या नसल्यामुळे वनविभाग वार्‍यावर आहे.
राज्यातील सतरा अधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अकोला वन विभागाचे उपवन संरक्षक व्ही. ए. धोकटे यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बदली करण्यात आली आहे. धोकटे नगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या जागेवर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नसून, त्यांचा प्रभार सध्या सहाय्यक वनसंरक्षक गोपाळे यांच्याकडे आहे. तसेच बुलडाणाचे उपवन संरक्षक डी. डी. गुजेला यांना बढती मिळाली असून, कुंडल वनविकास अकादमी सांगली येथे ते वनसंरक्षक म्हणून रुजू होणार आहेत. अकोल्यातील सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पद एक वर्षांपासून रिक्त आहे. तर येथील प्रभार अमरावती येथील अधिकार्‍यांकडे आहे. एक वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक उपक्रम रखडले आहेत. या पदावर कायमस्वरूपी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक विजय गोडबोले १ ते १५ जुलैपर्यंत सुटीवर आहेत. त्यांचा प्रभार आकोट येथील उपवन संरक्षकांकडे आहे. एकाच अधिकार्‍यांकडे दोन प्रभार असले तर दोन्हीकडील कामांवर प्रभाव पडतो.
जिल्ह्यातील तीनही महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती सध्या कर्तव्यावर नाही. शासनाने जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: Akola district forest department war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.