‘ई-फेरफार’मध्ये अकोला जिल्हा राज्यात अव्वल!
By Admin | Updated: February 19, 2015 02:08 IST2015-02-19T02:08:08+5:302015-02-19T02:08:08+5:30
अरुण शिंदे यांची माहिती: सातही तालुक्यात ई-फेरफार सुरू.

‘ई-फेरफार’मध्ये अकोला जिल्हा राज्यात अव्वल!
अकोला : जिल्ह्यातील सातही तालुक्यात ई-फेरफार कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ई-फेरफार सुरू करणारा अकोला जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील सातही तालुक्यात एकूण १ हजार ९ गावे असून, ३ लाख ३५ हजार ५0१ सात-बारा आहेत. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात गत १ ऑगस्टपासून आणि उर्वरित सहा तालुक्यांमध्ये १३ फेब्रुवारीपासून ई-फेरफार कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ई-फेरफार होणारा अकोला जिल्हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले. राज्य शासनाच्या राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार ही स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये ह्यम्युटेशन सेलह्ण कार्यान्वित करण्यात आले. तालुका पातळीवरील दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख कार्यालय आणि तहसील कार्यालय इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात आले. तसेच जिल्ह्यातील २८५ तलाठी व २५ मंडळ अधिकार्यांना डिजिटल स्वाक्षरी, लॅपटॉप, प्रिंटर व डेटा कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, मंडळ अधिकारी व तलाठय़ांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व सात-बाराचा ह्यडाटाह्ण अद्ययावत तयार करण्यात आला असून, ह्यई-फेरफारह्णप्रणाली तसेच ह्यई-चावडीह्ण प्रणाली परस्पर संबंधित असून, ई-फेरफार प्रणालीमुळे स्वयंचलित पद्धतीने १ ते २१ नमुने अद्ययावत होणार आहेत. त्यामुळे तलाठय़ांचे काम सुसह्य झाले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा अद्ययावत सात-बारा वेबसाईटद्वारे कुठेही, केव्हाही आता सहज पाहता येईल व त्याची प्रतदेखील प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.