शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकोला जिल्हय़ात ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ कारवाईचा फज्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:35 AM

अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ ड्रक अँण्ड ड्राइव्ह’च्या कारवाया करण्यात आल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या निर्देशाला पोलीस अधिकार्‍यांचा खोकेवळ १४ जणांवर कारवाई

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ 'ड्रक अँण्ड ड्राइव्ह’च्या कारवाया करण्यात आल्याचे वास्तव आहे. नशेत तर्र्र असलेल्या युवकांचा रात्रभर हैदोस सुरू असताना आणि त्यासाठी चौकाचौकांत मोठा बंदोबस्त तैनात असतानाही केवळ १४ कारवाया झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला जिल्हय़ातील पोलीस अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हय़ातील वाईन बार व हॉटेल्स रात्रभर सुरू होते. शहरासह जिल्हय़ातील बहुतांश हॉटेल्स व वाईन बारवर मद्यधुंद युवकांचा दारूच्या नशेत धिंगाणा सुरू होता. यामध्ये विद्या नगरसह शहरातील अनेक हॉटेल्सचा समावेश आहे. या मद्यधुंदांर वचक राहावा म्हणून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी जिल्हय़ातील पोलीस अधिकार्‍यांना तळीरामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्‍यांवर कारवाईचा विशेष मॅसेज वायरलेसवर देण्यात आला.  रात्रभर दोन हजारांवर पोलिसांचा ताफा तैनात केला मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील पोलीस अधिकार्‍यांनी केवळ १४ ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्‍यांवर कारवाई केली. यावरुन अकोला पोलीस रात्रभर किती सजग होते, याचा अंदाज येत असून, पोलिसांची ही कारवाईची आकडेवारी मान खाली घालणारी असल्याचे वास्तव आहे. खुद्द पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतरही कारवाई करण्यात टाळाटाळ केली असल्याचे वृत्त आहे. 

अकोट ग्रामीणमध्ये सर्वाधिक कारवायाअकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात सर्वाधिक चार तळीरामांवर कारवाई करण्यात आली. तसेच अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा शहरात मात्र कारवाईला बगल देण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा अकोला शहरात ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्‍या केवळ ४ ते ५ जणांवर कारवाई करण्यात आली. यावरून अकोला जिल्हय़ात नववर्षाचा जल्लोषच झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

मद्यपींचा रात्रभर धिंगाणाजिल्हय़ात केवळ १२ कारवाया झाल्यामुळे अकोल्यात दारू विक्रीच झाली नसल्याचा शोध काही पोलिसांकडून लावण्यात येत आहे. म्हणजेच नववर्षाच्या स्वागताला नागरिकांनी टाळल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, जिल्हय़ातील हॉटेल व लॉन्सवर रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत चाललेला धिंगाणा पोलिसांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण