अकोला जिल्हा भक्तिमय!
By Admin | Updated: February 11, 2015 01:18 IST2015-02-11T01:18:33+5:302015-02-11T01:18:33+5:30
प्रकट दिनानिमित्त भाविकांमध्ये उत्साह, आज विविध कार्यक्रमांचे आयोजन.

अकोला जिल्हा भक्तिमय!
अकोला: संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्ताने जिल्ह्यातून शेकडो पालख्या आणि भाविक मंगळवारी शेगाव करिता रवाना झाले. प्रकट दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेगावकडे जाणार्या भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
प्रकट दिनानिमित्ताने अकोला शहरात चौकाचौकांत, गल्लोगल्लीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. संत गजानन महाराजांच्या विविध रूपांमधील मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात. तसेच गावांमध्येही महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी आकोटपासून तर अकोला शहरापर्यंंत प्रत्येक गावात तसेच बस थांब्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. संत गजानन महाराजांच्या मूर्ती ठेवून पेंडाल टाकून भक्तांच्या आरामाचीही व्यवस्था करण्यात आली होती.