अकोला जिल्हा विकास आराखड्यात वाढीव ४६ कोटींचा निधी!
By Admin | Updated: March 9, 2015 01:47 IST2015-03-09T01:47:26+5:302015-03-09T01:47:26+5:30
जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा पोहोचला १४0 कोटींवर.

अकोला जिल्हा विकास आराखड्यात वाढीव ४६ कोटींचा निधी!
संतोष येलकर / अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विकासकामांच्या आराखड्यात ४६ कोटी २९ लाखांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आल्याचा आदेश राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा यावर्षीचा आराखडा १४0 कोटींवर पोहोचला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्ष तेखाली गत २४ जानेवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत सन २0१५-१६ या वर्षीच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या ९३ कोटी ६७ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेले प्रारूप विकास आराखडे अंतिम करण्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत २९ जानेवारी रोजी अमरावती येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ासाठी १५0 कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समि तीमार्फत वित्त मंत्र्यांकडे करण्यात आली होती. वाढीव निधीची मागणी विचारात घेत, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी १३९ कोटी ९६ लाखांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला. यासंदर्भात राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून ३ मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आदेश ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे यापूर्वी ह्यडीपीसीह्णमार्फत मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण प्रारूप आराखड्यात ४६ कोटी २९ लाखांचा वाढीव निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा आराखडा आता १३९ कोटी ९६ लाखांचा झाला आहे.