अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प
By Admin | Updated: July 10, 2014 01:28 IST2014-07-10T01:20:57+5:302014-07-10T01:28:22+5:30
महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प
अकोला : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. महसूल कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया तील कामकाज ठप्प झाले होते.
महसूल कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने संप पुकारला होता. त्यावेळी मागण्या पूर्ण करण्याबाबत तत्त्वत: मान्यता दिली होती. मागण्या पूर्ण करणे विविध विभागाच्या संबंधित असल्याने, संबंधित मागण्या विविध विभागांकडे पाठविण्यात आल्या होत्या; मात्र महसूल कर्मचार्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महसूल कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महसूल कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत विविध विभागांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते.