शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘शुन्य सावली’ दिवसाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:00 PM

सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अनुभवला.

ठळक मुद्देसुर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणूकाही ती गायब झाली असा भास होतो. हा सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अकोलेकरांनी अनुभवला.

अकोला: जेव्हा सुर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणूकाही ती गायब झाली असा भास होतो. हा सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अनुभवला. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, प्रभात किड्सचे विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते.पृथ्वी सुर्याभोवती भ्रमण करताना पृथ्वी आपल्या कक्षात साडेतेवीस अंश सुर्याकडे झुकते.यामुळे सुर्योदय आणि सुर्यास्त प्रत्येक दिवशी स्थान बदलवून होत असतो. यामुळे उत्तरायन व दक्षिनायन होत असते. प्रत्येक वर्षी दोन दिवस सुर्य विषुववृत्तावर असल्यामुळे रात्र व दिवस समान असतात. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात सुर्य कधी डोक्यावर येत नाही. तो सदैव दक्षिण किंवा उत्तरेकडे असतो. परंतू या दोन टोकाच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वषार्तून दोनदा सुर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सुर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणूकाही ती गायब झाली असा भास होतो. हा सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अकोलेकरांनी अनुभवला.आपली सावली आपली सोबत सोडून गेली आहे असे कधीच होत नाही. परंतू ती वषार्तून दोन वेळा हरवू शकते. सुर्य अगदी आपल्या डोक्याच्या तंतोतंत वर असतो आणि त्यामुळे आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबरआपल्या पायाखाली किंवा कोणत्याही वस्तूची सावली त्या वस्तूखाली लपते त्यामुळे ती दिसत नाही. म्हणजेच शुन्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) होय. 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयZero Shadow Dayशून्य सावली दिवस