अकोला जिल्हय़ात ४ हजार ४६५ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

By Admin | Updated: October 20, 2014 01:57 IST2014-10-20T01:55:06+5:302014-10-20T01:57:20+5:30

लोकसभेच्या तुलनेत नकाराधिकाराचा वापर कमी.

Akola District 4, 465 voters used 'Nota' | अकोला जिल्हय़ात ४ हजार ४६५ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

अकोला जिल्हय़ात ४ हजार ४६५ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील पाचही मतदारसंघात ४ हजार २६५ म तदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) वापर केल्याचे चित्र रविवारी झालेल्या मतमोजणीत स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ात ५ हजार ११0 मतदारांनी ह्यनोटाह्णचा वापर केला हो ता. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात ह्यनोटाह्णचा वापराच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या मे २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अकोला जिल्हय़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात ५ हजार ११0 मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) वापर केला. त्यामध्ये आकोट मतदारसंघात १ हजार १२९, बाळापूर मतदारसंघात ९९४, अकोला पश्‍चिम मतदारसंघात ९0८, अकोला पूर्व मतदारसंघात १ हजार १४0 आणि मूर्तिजापूर म तदारसंघात ९३३ मतदारांनी ह्यनोटाह्णचा वापर केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी झाली. या मतमोजणीत जिल्हय़ातील पाचही मतदारसंघात ४ हजार २६५ मतदारांनी ह्यनोटाह्ण चा वापर केल्याचे चित्र समोर आले आहे. त्यानुषंगाने लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात ह्यनोटाह्ण वापराच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. अकोला शहरात ह्यनोटाह्णचा वापर जास्त! विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील पाचही मतदारसंघात मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) केलेल्या वापरात अकोला शहरात ह्यनोटाह्णचा वापर करणार्‍या मतदारांची संख्या जास् त असल्याचे चित्र मतमोजणीत स्पष्ट झाले आहे.

Web Title: Akola District 4, 465 voters used 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.