अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 07:14 PM2021-03-06T19:14:17+5:302021-03-06T19:16:21+5:30

391 corona positive In Akola district आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८३ झाली आहे.

In Akola district, 391 corona positive, two died in a day | अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे१९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.सद्यस्थितीत ४,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, ६ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ५३ अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८,७८० वर पोहोचली आहे. १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ४,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७४० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील १८, जीएमसी येथील ११, गोरक्षण रोड येथील नऊ, मुर्तिजापूर व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, तापडीया नगर, जूने शहर, मोठी उमरी, मोहला, आपातापा, व्याळा येथील प्रत्येकी सहा, गीता नगर, लहान उमरी, शिवनी व हिवरा कोरडे येथील प्रत्येकी पाच, हनुमान वस्ती, राम नगर व निंबी येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, शिवसेना वसाहत, जठारपेठ, खेतान नगर, मलकापूर, पातूर, झुरळ बु., मांडवा बू., वडाली देशमुख व कंजारा येथील प्रत्येकी तीन, किर्ती नगर, संत कंवर नगर, वृंदावन नगर, जवाहर नगर, मालीपुरा, गावित फैल, गड्डम प्लॉट, नेहरु नगर, तेल्हारा,कैलास टेकडी, बाळापूर, ब्रामी वाई, स्टेशन एरिया व माझोद येथील प्रत्येकी दोन, पोलिस हेडक्वॉर्टर, हरिहर पेठ, खडकी, वानखडे नगर, ताजणा पेठ, पोला चौक, खदान, भिम नगर, सराफा बाजार, भुसारी हॉस्पीटल, आदर्श कॉलनी, बिर्ला गेट, तुकाराम चौक, पंचशिल नगर, हरिहर पेठ, बोरगाव मंजू, कलेक्टर कॉलनी, कपडा मार्केट, खोलेश्वर, बाळापूर नाका, लाल बंगला, दुबे वाडी, लेडी हार्डींग जवळ, मोहिते प्लॉट, मिलन नगर, नवाबपुरा, गौतम नगर, निमवाडी, गायत्री नगर, आनंद नगर, मराठा नगर, कृषी नगर, देशपांडे प्लॉट, गंगा नगर, दुर्गा चौक, राजेश्वर मंदिर, बालाजी नगर, भीम नगर, बाळापूर रोड, दिपक चौक, एपीएमसी मॉर्केट, दिनोडा, बस स्टँण्ड, रामदासपेठ, हिंगणा रोड, कौलखेड, राऊतवाडी, रवी नगर, येलवन, श्री नगर, डोंगरगाव, साने गुरुजी नगर, शास्त्रीनगर, काळा मारोती, चिवचिव बाजार, जाजू मॉर्केट, कृष्ण टॉवर, देऊळगाव, बालाजी नगर, गोयका नगर, अकोट, कळबेश्वर, कुरणखेड व पैलपाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी पातूर येथील १९, लहान उमरी व मोठी उमरी येथील प्रत्येकी सात, रणपिसे नगर येथील सहा, कुरणखेड, जठारपेठ व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, पैलपाडा, जवाहर नगर, शास्त्री नगर, न्यु राधाकिसन प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नेकलेस रोड, उत्तरा कॉलनी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत, मलकापूर, सांगळूद, मुर्तिजापूर, वर्धमान नगर, सातव चौक, मुकूंद नगर, माधव नगर, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, जूने शहर, म्हैसांग, गजानन नगर, शिवणी, आदर्श कॉलनी, खोलेश्वर, न्यु तापडीया नगर, लक्ष्मी नगर,काटेपूर्णा, अन्वी मिर्झापूर, निपाणा, भारतीय हॉस्पीटल, डाबकी रोड, दिपक चौक, जीएमसी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोघांचा मृत्यू

शनिवारी सिव्हिल लाइन अकोला येथील ७३ वर्षीय पुरुष व नायगाव, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २७ फेब्रुवारी २ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

१९६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १२, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, आर्युवेदिक रुग्णालय येथून १२, अवघाते हॉस्पीटल येथून आठ, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील ९२ अशा एकूण १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४,५३३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,७८०जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: In Akola district, 391 corona positive, two died in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.