अकोला जिल्ह्यात २७.६ मि.मी. पाऊस

By Admin | Updated: June 15, 2015 02:08 IST2015-06-15T02:01:07+5:302015-06-15T02:08:18+5:30

आकोटात सर्वाधिक; रविवारी तेल्हा-यात मुसळधार

Akola district is 27.6 mm Rain | अकोला जिल्ह्यात २७.६ मि.मी. पाऊस

अकोला जिल्ह्यात २७.६ मि.मी. पाऊस

अकोला- गत दोन दिवसांत पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अजूनही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असली तरी रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंंंंत संपलेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी २७.६ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद आकोट तालुक्यात झाली. जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाला. शनिवारी दमदार पावसाने झोडपून काढलेल्या आकोट शहर आणि तालुक्यात सर्वाधिक ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ बाळापूर ४३ मि.मी., बाश्रीटाकळी ३४ मि. मी., मूर्तिजापूर २२ मि.मी., पातूर १२ मि.मी., अकोला १0.४ मि.मी. आणि तेल्हारा तालुक्यात ९ मि.मी. पाऊस झाला. शनिवारी रात्री आलेल्या पावसाने आकोट शहरातील रस्ते जलमय झाले होते, तर बाळापूरमधील मन आणि मस नदीला पूर आला होता. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास तासभर दमदार पाऊस कोसळला. अकोला शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात १0 मिनिटे पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ६३.१0 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Akola district is 27.6 mm Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.