शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अकोला जिल्ह्यात २.४३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:43 PM

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली.

- संतोष येलकरअकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी वर्षाकाठी जिल्ह्याला १४६ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी सरकारच्या कार्यकाळातील अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला. त्यामध्ये शेतकºयांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार असून, या योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत (पाच एकरपेक्षा कमी) शेतजमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यानुषंगाने या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वर्षाकाठी १४६ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले असे आहेत शेतकरी!तालुका                                      शेतकरीअकोला                                    ५६९४०बाळापूर                                   २९३७१पातूर                                       २५९५९मूर्तिजापूर                                ३४०१३बार्शीटाकळी                              २८८३३अकोट                                       ३९३४०तेल्हारा                                     २९४९४......................................................एकूण                                    २४३९५०

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीBudget 2019अर्थसंकल्प 2019