लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रिपाइं (आठवले गट)चा पश्चिम विदर्भाचा सचिव आणि एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेल्या सुनील पंढरी अवचार याच्याविरुद्ध बाळापूर पोलिसांनी रविवारी दुपारी खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. वाडेगाव येथे राहणारे प्रमोद शंकरराव डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुनील अवचार रिपाइंचा पश्चिम विदर्भाचा सचिव असून, त्याने प्रमोद डोंगरे यांना मोबाइलवर संपर्क साधून वाडेगावात तुझा वाईनबार आहे. हा वाईनबार सुरू ठेवायचा असेल, तर पाच लाख रुपये दे, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास, तुला ठार मारेल, अशी धमकी दिली. प्रमोद डोंगरे यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुनील अवचार याच्याविरुद्ध तक्रार दिली. बाळापूर पोलिसांनी अवचारविरुद्ध भादंवि कलम ३८४, ३८६ नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्या त येणार आहे.
अकोला : रिपाइंच्या पश्चिम विदर्भ सचिवावर खंडणीचा गुन्हा; सुनील अवचार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:22 IST
अकोला : रिपाइं (आठवले गट)चा पश्चिम विदर्भाचा सचिव आणि एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेल्या सुनील पंढरी अवचार याच्याविरुद्ध बाळापूर पोलिसांनी रविवारी दुपारी खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
अकोला : रिपाइंच्या पश्चिम विदर्भ सचिवावर खंडणीचा गुन्हा; सुनील अवचार गजाआड
ठळक मुद्देपाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप