शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:14 PM

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली.

अकोला: कोट्यवधींच्या मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणे, गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवण्यासोबतच अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम परस्पर बंद करणे, पाणीपट्टी वसुलीकडे पाठ फिरवण्याची बाब गांभीर्याने घेत मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. यामध्ये टॅक्स विभागाचे कर अधीक्षक, चारही सहायक कर अधीक्षकांसह जलप्रदाय विभागातील उपअभियंत्यांचाही समावेश आहे. यादरम्यान, कर वसुली लिपिक गणेश चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश आयुक्तांनी जारी केला.महापालिकेचा प्रशासकीय कारभार रसातळाला गेल्याचे चित्र आहे. प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर अवघ्या १६ कोटींच्या उत्पन्नाने ७० कोटींचा पल्ला गाठला. कर विभागातील वसुली लिपिकांनी प्रामाणिकपणे टॅक्सची वसुली केल्यास मनपा कर्मचाºयांच्या थकीत वेतनाची समस्या निर्माणच होणार नाही, अशी परिस्थिती असताना २०१८-१९ मधील ४५ कोटी आणि चालू आर्थिक वर्षातील ७० कोटी अशी एकूण ११५ कोटींची थकबाकी आहे. या वसुली लिपिकांवर कर अधीक्षक विजय पारतवार, चारही सहायक कर अधीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर वसुली ठप्प असल्याचा ठपका ठेवत मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधितांसह ४२ वसुली लिपिकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यासोबतच जलप्रदाय विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली असता, मानधनावरील उपअभियंता एच.जी. ताठे यांच्यासह कंत्राटी कनिष्ठ अभियंता, फिटर, व्हॉल्व्हमन अशा ११५ कर्मचाºयांवर वेतनवाढ रोखण्याचा बडगा उगारला.गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करणे भोवलेसोशल मीडियावर मनपाचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्याप्रकरणी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे स्वीय सहायक संजय कथले यांची तीन वेतनवाढ तसेच नगरसचिव विभागातील प्रमुख सहायक किशोर सोनटक्के यांची दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यादरम्यान, लेखा विभागातील प्रमुख सहायक देवीदास निकाळजे यांची पश्चिम झोन कार्यालयात सहा. कर अधीक्षक पदी बदली करण्याचे निर्देश दिले.सभापतींचा दरबार भोवलामालमत्तांचे हस्तांतरण व खुल्या भूखंडांच्या नोंदीसाठी नागरिकांना झुलवत ठेवणाºया मालमत्ता कर विभागाची १७ जून रोजी मनपाचे स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी चांगलीच शाळा घेतली होती. नागरिकांच्या तक्रारी पाहता या विभागातील कर्मचाºयांच्या कार्यशैलीवर विनोद मापारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा दरबार कर विभागाच्या अंगलट आल्याची चर्चा आहे.

मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी कारवाईमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी जलप्रदाय व टॅक्स विभागाची झाडाझडती घेतली. कर वसुलीकडे पाठ फिरवणे, अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम बंद करून पाणीपट्टी वसुली ठप्प पाडणे, गळती लागलेल्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. मनपाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.कर वसुली लिपिकाने नेमकी किती टक्के वसुली केली, त्यानुसार संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येऊन काहींच्या वेतनातून रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. जशी जबाबदारी, तशी कारवाई केली असून, यापुढे जलप्रदाय व कर विभागाच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका