अकोला मनपाला मिळणार मुद्रांक अधिभाराचे ६५ लाख
By Admin | Updated: July 24, 2014 02:07 IST2014-07-24T02:06:45+5:302014-07-24T02:07:14+5:30
मुद्रांक अधिभाराचे १ टक्का अधिभारापोटी महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख वितरित करण्याचे आदेश.

अकोला मनपाला मिळणार मुद्रांक अधिभाराचे ६५ लाख
अकोला : राज्य शासनाकडून जमा करण्यात येणार्या मुद्रांकांतून देण्यात येणार्या १ टक्का अधिभारापोटी अकोला महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख २८ हजार रुपये वितरित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी जारी केले आहेत. या निधीमुळे आर्थिक संकटाच्या काळातून जात असलेल्या अकोला महानगरपालिकेच्या तिजोरीतील गंगाजळी वाढण्यास मदत होणार आहे. मुद्रांक अधिभारापोटीची रक्कम राज्यातील महापालिकांना वितरित करण्यासाठी वित्त विभागाने ८00 कोटींची तरतूद केली होती.; मात्र, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यात आणखी ४९५ कोटींची वाढ करून ही रक्कम १२९५ कोटी करण्यात आली. त्यातून, २0१३-१४ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीपोटी राज्यातील १४ महापालिकांना २0३ कोटी ३४ लाख रुपये ५ मे रोजी वितरित केले होते. आता नव्याने २५ महापालिकांना त्यांच्या गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजे जानेवारी ते मार्च २0१४ या तीन महिन्यांची २३८ कोटी थकबाकी देण्यात येणार आहे. त्यातून अकोला महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख २८ हजार रुपये मिळणार आहेत. एलबीटी लागू झाल्यांनतर अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कर्मचार्यांचे वेतन, रखडलेली विकास कामे यासाठी निधीची तरतूद करताना अधिकार्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी मनपाचे अधिकारी धडपडत असतानाच मुद्रांक अधिभाराच्या थकबाकीची रक्कम मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.