उन-सावलीच्या लपंडावात अकोलेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा खेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 20:12 IST2021-05-23T20:11:54+5:302021-05-23T20:12:57+5:30
Zero shadow day : उन सावलीच्या लपंडावातच अनेक आकाशप्रेमींनी आपल्या घरून अथवा गच्चीवरून या आनंददायी क्षणांचा अनुभव घेतला.

उन-सावलीच्या लपंडावात अकोलेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा खेळ!
अकोला : वर्षातून दोनदा येणारा शून्य सावली दिवस खगोलातील महत्त्वाचा योग असतो. अभ्यासक आणि विद्यार्थी या दिवसाची वाट पाहत असतात. अकोला जिल्ह्यातील जनतेलाही हा शून्य सावली दिवस रविवारी अनुभवता आला.पृथ्वीच्या कलून फिरण्यामुळे सूर्याचे भ्रमण मार्गात घडून येणाऱ्या बदलाने सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्त या पट्ट्यामधील प्रदेशात नेमका डोक्यावर येतो. त्या दिवशी लंबरुप किरणामुळे आपली सावली काही प्रमाणात नाहिसी झाल्याचे दिसते. हा दिवस शून्य सावली दिवस म्हणून ओळखल्या जातो. अकोल्यात यावर्षी २३ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता येणाऱ्या या संधीचा लाभ काही प्रमाणात आकाशात मेघांची गर्दी झाल्याने उन सावलीच्या लपंडावातच अनेक आकाशप्रेमींनी आपल्या घरून अथवा गच्चीवरून या आनंददायी क्षणांचा अनुभव घेतला. विश्वभारती केंद्राव्दारा देखील अगदी छोट्या स्वरुपात या कार्यक्रमाचा आनंद अनुभवला.