Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान
By रवी दामोदर | Updated: November 22, 2023 18:48 IST2023-11-22T18:47:40+5:302023-11-22T18:48:38+5:30
Akola News: अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान
- रवी दामोदर
अकोला - अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.
कार्यक्रमानुसार, दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे.
जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी, तर अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी व निशाणी वाटप अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी व अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३.३० नंतर होईल. मतदान केंद्राची यादी दि. १३ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आणि मतमोजणी दि. १८ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून होईल. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव २१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आचार संहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहणार आहे. ऐन थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापणार आहे.