शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : महिला जळाल्याचे प्रकरण; पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:02 IST

अकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली.

ठळक मुद्देआत्महत्येचीच दाट शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली; मात्र हा खून नसून, सदर महिलेने आत्महत्या केल्याचा संशय पोलीस अधीक्षकांनीही व्यक्त केला.दगडी पुलानजीक एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. जळालेल्या महिलेचे वय ६५ वर्षांच्यावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिला उभी असताना जळाली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सदर गंभीर प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पुन्हा तपासणी केली. यामध्ये महिलेने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

खून नसल्याचे जवळपास निश्‍चितउत्तरीय तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला असून, यामध्ये महिलेचा खून झाला नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. या महिलेने आत्महत्या केल्याचाच संशय पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकार्‍यांना आहे; मात्र तरीही पोलिसांनी चारही दिशेने तपास सुरू ठेवला आहे.

घटनास्थळावर मिळालेले साहित्यघटनास्थळावर पिवळय़ा धातूची बांगडी, अंगठी, तीन चावीचे गुच्छे, एक चष्मा, पाणी बॉटलचे झाकण, पांढरे पट्टे असलेले निळसर साडीचे तुकडे कथ्थ्या रंगाचे ब्लँकेट घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनCrimeगुन्हा