अकोला पूर्ववर भाजपचा दावा!

By Admin | Updated: September 8, 2014 00:11 IST2014-09-08T00:11:29+5:302014-09-08T00:11:29+5:30

जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अकोला पूर्व मतदारसंघावर भाजपचा दावा.

Akola BJP claims before! | अकोला पूर्ववर भाजपचा दावा!

अकोला पूर्ववर भाजपचा दावा!

अकोला- जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला अकोला पूर्व म तदारसंघावर भाजपने दावा केला आहे. राज्यात वाढवून मागितलेल्या मतदारसंघांमध्ये अकोला पूर्व या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यातच शिवसेनेकडून तिकिटासाठी सुरू असलेला कलह भाजपच्या पथ्यावरच पडत असल्याने सेनेच्या गोटातूनही हा मतदारसंघ भाजपला देण्याबाबत अनुकूलता दर्शविल्या जाण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यापासून अकोला जिल्ह्यातील आकोट आणि अकोला पूर्व (पूर्वाश्रमीचा बोरगाव मंजू) मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अकोला पश्‍चिम आणि बाळापूरसह मूर्तिजापूर हा राखीव मतदारसंघ भाजपकडे आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पकड असल्याने अकोला शहरातील काही भाग व तालुक्यातील बहुतांश भाग असलेला अकोला पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या सोयीचा राहिला आहे. असले तरी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून संजय धोत्रे यांनी मोठी आघाडी घेतली होती. तसेच राज्यात भाजपचे वाढलेले बळ बघता १४ मतदारसंघ शिवसेनेने वाढवून मागितले आहे त. या मतदारसंघांमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व या मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून पक्षाच्या नेत्यांनी दावा केला असला तरी त्याच्या बदल्यात शिवसेना जिल्ह्यात दुसरा कोणताही मतदारसंघ सोडला जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपचा हा दावा किती मान्य केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने एकीकडे या मतदारसंघावर दावा केला असतानाच दुसरीकडे शिवसेनेकडून या म तदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी याच मतदारसंघावर दावा केला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर घेतलेल्या मुलाखतीच्यावेळी याच मतदारसंघातील तिकिटाच्या दाव्यावरून तीन शिवसेना नेत्यांमध्ये ज्येष्ठे नेत्यासमोरच खडाजंगी उडाली होती. नेत्यांमध्ये ितकिटासाठी असलेले ही स्पर्धा बघून शिवसेना नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची भाषाही बोलून दाखविली होती. त्यामुळे भाजपच्या दाव्याला बळ मिळाले आहे.
अकोला पूर्व हा मतदारसंघ मित्रपक्ष शिवसेनेच्या ताब्यात असला तरी तो भाजपला मिळावा म्हणून आम्ही प्रस्ताव दिला असल्याचक भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी स्पष्ट केले.

Web Title: Akola BJP claims before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.