शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : नववर्षाचा जल्लोष करून परतताना दुचाकी खांबावर आदळली; एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:51 IST

गोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्‍या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गोरेगाव खुर्दनजीक घडली.  शिरीष विश्‍वासराव तायडे रा. गोरेगाव असे मृतक तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्देगोरेगाव येथील घटना नववर्षाचा जल्लोष करून परतताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्‍या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गोरेगाव खुर्दनजीक घडली.  शिरीष विश्‍वासराव तायडे रा. गोरेगाव असे मृतक तरुणाचे नाव आहे.अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील काही तरुणांनी  ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गावानजीकच्या शेतात पार्टी आयोजित केली होती. गावातीलच आदित्य तिडके यांच्या शेतात न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी रंगली. या पार्टीत शिरीष तायडे हा रत्नदीप तायडे व रोहन तायडे या आपल्या सैन्यातील मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलवरून गेला. मध्यरात्रीपर्यंत पार्टी केल्यानंतर घराकडे परत येत असताना रत्नदीप मोटारसायकल चालवित होता. मन्साराम तिखिले यांच्या शेताजवळच्या वळणावर रत्नदीपचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये शिरीष तायडे हा जागीच मृत्युमुखी पडला. या अपघातात रत्नदीप तायडे हा देखील जखमी झाला. यावेळी त्यांच्यासोबतच घरी परत येत असलेल्या मुकेश तायडे, सचिन तायडे, गोलू मुंडे यांनी शिरीष तायडे याला अकोला येथे रुग्णालयात आणले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरीष हा विश्‍वासराव तायडे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण31st December party31 डिसेंबर पार्टीAccidentअपघातDeathमृत्यू