अकोला-बार्शीटाकळी रस्त्याचा बांधकाम विभागाला विसर

By Admin | Updated: May 11, 2014 18:39 IST2014-05-11T18:03:23+5:302014-05-11T18:39:39+5:30

वाहनचालक व प्रवास करणार्‍यांना प्रचंड त्रास

Akola-Barshitti road construction department forgets | अकोला-बार्शीटाकळी रस्त्याचा बांधकाम विभागाला विसर

अकोला-बार्शीटाकळी रस्त्याचा बांधकाम विभागाला विसर

लोहगड : अकोला ते बार्शीटाकळी रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील वाहनचालक व प्रवास करणार्‍यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वृत्तपत्रांमधून या रस्त्याच्या अवस्थेविषयी अनेकदा वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतरही सर्वाधिक खड्डे असलेला हा रस्ता अजूनही दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा, तर करीत नाही ना, असे जनतेला वाटू लागले आहे.
अकोला-मंगरू ळपीर असा हा राज्यमार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे; परंतु रस्त्यावर फूट दोन फू ट अंतरावर खड्डे पडल्यामुळे या मार्गावर वाहन चालविणे जवळपास अशक्यच झाले आहे. बांधकाम विभागाच्यावतीने गतवर्षी या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली होती. या कामात लाखो रुपयांचे देयके काढली. सर्वकाही आलबेल असल्याचे वातावरण निर्माण करण्यात संबंधित कर्मचारी यशस्वी झाले; परंतु वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या प्रकाराकडे कानाडोळा केल्यामुळे अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. अकोला जिल्‘ातील अनेक महत्त्वपूर्ण रस्त्याची वाट लागली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने काहीच काम सुरू नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी याच मार्गाने अनेकदा जातात; परंतु खड्डे पाहूनही या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटू नये, हेसुद्धा नवलच म्हणावे. अकोला ते बार्शीटाकळी दरम्यानच्या गावांतील या रस्त्यावर प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांच्या मनात रस्त्याच्या अवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत असंतोष वाढत असून, पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Akola-Barshitti road construction department forgets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.