अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये किंकाळय़ा अन आक्रोश..
By Admin | Updated: August 15, 2016 02:44 IST2016-08-15T02:44:07+5:302016-08-15T02:44:07+5:30
मन सुन्न करणारी घटना; रुग्णालयात अनेकांचे डोळे पाणावले!

अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये किंकाळय़ा अन आक्रोश..
सचिन राऊत
अकोला, दि. १४: मित्र नगरला लागून असलेल्या वसाहतमधील दोन चिमुकले खेळत असतानाच दोघांचाही पाण्यात बुडून अचानक मृत्यू झाल्याचे त्यांच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी सवरेपचार रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील बेडवर मृतावस्थेत असलेली दोन मुले जणू झोपलेली आहेत अशी अवस्था बघून त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश अन् किंकाळय़ांनी सवरेपचार रुग्णालय हेलावले.
सिद्धार्थचे वडील मोलमजुरी करणारे; मात्र तरीही मुलगा हिंदू ज्ञानपीठसारख्या मोठय़ा शाळेत दुसर्या वर्गात शिक्षण घेत होता तर कृष्णाचे वडील हॉटेलमध्ये काम करणारे; मात्र मुलगा गुरुनानक विद्यालयात चौथ्या वर्गाला शिक्षण घेत होता. दोघांच्याही वडिलांनी मुलांना अभियंता करण्याची स्वप्ने बघितली; मात्र नियतीने रविवारी दोघांच्याही स्वप्नांची राखरांगोळी केली. अचानक झालेल्या या घटनेने सिद्धार्थ आणि कृष्णाचे नातेवाईक स्तब्ध झाले. सिद्धार्थचे आई-वडील या घटनेने सुन्न होऊन सवरेपचारमध्येच कोसळले. तर कृष्णाचे आई-वडील बहिणीच्या डोळय़ातून अश्रूच्या धारा वाहतच होत्या. मनपा प्रशासन, जलवर्धन संस्था, नगरसेवक किं वा प्रशासकीय यंत्रणेची हलगर्जी या दोन बालकांच्या जिवावर उठली. आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. घरात दिवस-रात्र किलबिलाट आणि आई-वडिलांच्या अंगा-खांद्यावर खेळणारी बालके प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराचे बळी ठरले. अचानक घडलेल्या या घटनेने सवरेपचार रुग्णालयात या दोन्ही मुलांच्या आई-वडिलांचा आणि नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश होता. त्यांच्या किंकाळय़ा अन् आक्रोश बघता अनेकांची डोळे पाणावली. चिमुकले मृतावस्थेत आहेत यावर आई-वडिलांचा विश्वासही बसत नव्हता. एकदा तरी आई म्हणून हाक दे या आशेने त्यांचे आई-वडील पाणावलेल्या डोळय़ांनी मुलांच्या अंगा-खांद्यावर हात फिरवित होते.