अकोला : 'श्रीं’चा प्रकट दिन झाला अन्नदान दिवस !

By Admin | Updated: February 18, 2017 19:18 IST2017-02-18T19:18:17+5:302017-02-18T19:18:17+5:30

अकोलेकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठया भक्तीभावात साजरा केला.

Akola: An Announcement Day of 'Shani' was a day! | अकोला : 'श्रीं’चा प्रकट दिन झाला अन्नदान दिवस !

अकोला : 'श्रीं’चा प्रकट दिन झाला अन्नदान दिवस !

>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १८ -  अकोलेकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठया भक्तीभावात साजरा केला. प्रकटदिनानिमित्त विविध मंदिरांमध्ये तसेच सामाजीक संस्थाच्या वतीने महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांची व्याप्ती ऐवढी वाढली आहे की प्रकटदिन हा जणू अन्नदान दिन म्हणून समोर आला आहे . ‘श्रीं’च्या जन्मदिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी वितरित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा अकोलेकरांनाी लाभ घेतला. 
श्री संत गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. हा दिवस महाराजांचा प्रकट दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी अकोलेकरांनीसुद्धा महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कौलखेड, मुकुंद नगर, देशमुख पेठ, जुने शहर, डाबकी रोड, खोलेश्वर गीता नगर आदी ठिकाणी असलेल्या ‘श्रीं’च्या मंदिरांमध्ये शनिवारी पहाटेपासूनच या उत्सवाला प्रारंभ झाला. त्यात काकडा आरती, महाराजांच्या मूर्तीला व पादुकांना दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथाचे पाराणय, आरती व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले. मंदिरांप्रमाणेच शहरात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था, संघटना व अपार श्रद्धा असलेल्या भाविकांनी स्वेच्छेने भंडारे आयोजित करून महाप्रसाद वितरित केला. महाप्रसादांमध्ये पिठलं-भाकरी, वांगे-बटाट्याची भाजी, ठेचा, शिरा, बुंदी अशा विविध पदार्थांची रेलचेल होती. पूर्वीच्या तुलनेत ‘श्रीं’च्या प्रकटदिनी भाविकांना शाश्वत अन्नदान करण्याची प्रथा अधिक रूढ होत चालली असल्याने, हा दिवस अन्नदान दिवस म्हणून साजरा होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Akola: An Announcement Day of 'Shani' was a day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.