विभागीय क्रीडास्पर्धेत अकोला व यवतमाळ संघाचे दमदार प्रदर्शन

By Admin | Updated: January 17, 2015 00:03 IST2015-01-17T00:03:00+5:302015-01-17T00:03:00+5:30

अमरावती विभागीय जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा.

Akola and Yavatmal team's strong performance in regional sports | विभागीय क्रीडास्पर्धेत अकोला व यवतमाळ संघाचे दमदार प्रदर्शन

विभागीय क्रीडास्पर्धेत अकोला व यवतमाळ संघाचे दमदार प्रदर्शन

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे अमरावती विभागीय जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी यजमान अकोला संघाने दमदार खेळ प्रदर्शन करीत वर्चस्व कायम राखले. त्यापाठोपाठ यवतमाळ संघाने आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
वैयक्तिक व सांघिक दोन्ही क्रीडाप्रकारांमध्ये अकोला व यवतमाळने सुंदर खेळप्रदर्शन केले. पुरुषांच्या गटात कबड्डी स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात बुलडाणा संघाला अमरावती संघाने पराभूत केले. दुसर्‍या सामन्यात यवतमाळ संघाने अकोलावर विजय मिळविला. महिला गटात अकोला संघाने वाशिमवर मात केली. खो-खो स्पर्धेत महिला गटात अकोला संघाने बुलडाणा संघाचा पराभव केला. व्हॉलीबॉल (स्ट्रोक) उपांत्य सामन्यात अकोला संघाने अमरावतीला पराभूत केले, तर दुसर्‍या सामन्यात बुलडाणा संघाने वाशिमला पराभूत करून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. कॅरममध्ये पुरुष गटात अकोला व यवतमाळच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. महिला गटात अकोला व बुलडाणाच्या खेळाडू अव्वल ठरल्या. कॅरम दुहेरीमध्ये पुरुष विभागात वाशिम व यवतमाळ आणि महिला विभागात अमरावती व बुलडाणा संघाच्या कॅरमपटूंमध्ये विजेतेपदाची चढाओढ लागली. टेबल-टेनिसमध्ये पुरुषांच्या गटात यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला एकेरीत आणि दुहेरीमध्ये वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती संघाचे खेळाडूंनी विविध गटांत विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाले. महिला गटात यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती संघाच्या खेळाडू आघाडीवर आहेत. बुद्धिबळमध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला संघाने अंतिम फेरी गाठली.

Web Title: Akola and Yavatmal team's strong performance in regional sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.