शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार

By atul.jaiswal | Updated: December 25, 2017 19:04 IST

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले.

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला अपघात.यामध्ये एम. एच. ३० ए. डी. ४२४५ क्रमांकाच्या मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाले. एम. एच. ३० झेड ५२६२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरील युवक या अपघातात गंभीर जखमी झाला.

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने अकोल्याकडे येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात शिवणी येथील राहुल नगरमधील दोघे तर एक जन हिंगना रोडवरील रहिवासी असे तीघे जन ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामूळे अकोला ते बाभुळगाव परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामूळे रोजच कीरकोळ अपघात होत आहेत. याच रोडवरील साहित्याची ने आण करण्यासाठी असलेल्या एम. एच. ३० ए. व्ही. १०५६ क्रमांकाचा ट्रक मुर्तीजापूरच्या दिशेने जात असताना शिवणी विमानतळासमोर रस्त्यावरील मोठया खड्डयांमूळे चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. ३० ए. डी. ४२४५ व  एम. एच. ३० झेड ५२६२ क्रमांकाच्या दोन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात पुरवठा विभागात कार्यरत असलेले विनायक पंजाबराव वानखडे रा. हिंगना रोड, गजानन गोवींदराव सदांशिव रा. राहुल नगर शिवणी, श्रीकृष्ण दौलत तायडे रा. राहुल नगर शिवणी हे दुचाकीवरील तिघेही जन ठार झाले. शिवणी विमानतळाजवळ अप्पू पुतळ्यासमोर हा अपघात घडल्यानंतर नागरिकांनी धाव घेउन मृतक जखमी असल्याच्या कारणावरुन त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला, यामधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर तीसºया व्यक्तीचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पळून जाण्याच्या बेतात असलेला ट्रक चालक राजेंद्र सिंग  रा. झारखंड याला पोलिसांनी व नागरिकांनी ताब्यात घेतले. यावेळी अपघात झाल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी बाभूळगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उन्मेष रिंंगणे, वैभव डोंगरे, संतोष भाकरे यांनी सहकार्य केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळित झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजुला करीत ही वाहतुक सुरळीत केली.

दोन दुचाकीवर बोलत जाणे धोक्याचे दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती या बोलत दुचाकी चालवीत राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. शहरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीवर दुचाकी चालवित असतांना गोष्टी करीत जाणारे आपल्याला नेहमीच दिसतात, अशाच प्रकारातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरhighwayमहामार्गAccidentअपघात