शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Akola: नीट-युजीमध्ये अकोला राज्यात सातवे, १० विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक तर सुमारे ८६१ विद्याथी ५०० प्लस!

By नितिन गव्हाळे | Updated: July 21, 2024 22:09 IST

Akola News: ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल अखेर मोठ्या गोंधळानंतर लागला आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

- नितीन गव्हाळे अकोला -  ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल अखेर मोठ्या गोंधळानंतर लागला आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केंद्रनिहाय आणि शहरनिहाय विद्यार्थ्यांचे मार्क जारी करण्यात आले आहे. या अकोला जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण तर सुमारे ८६१ विद्यार्थ्यांना ५०० प्लस गुण मिळाले आहेत.

नीट परीक्षेसाठी अकोल्यात १७ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या परीक्षा केंद्रांवरून एकूण ८ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याचे दिसून येते. नीट असो जेईई असो किंवा सीए इंटरमीडिएड, फायनल परीक्षा असो. या सर्वच परीक्षांसाठी अकोला शहर एज्युकेशन हब म्हणून उदयास आले आहे. या सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये अकोल्यातील विद्यार्थी बाजी मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थीसुद्धा शिक्षणाच्या दृष्टीकोनातून अकोला शहराला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. नीट परीक्षेत अकोला शहराने राज्यात सातवा क्रमांक पटकावला असून, या निकालाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अकोला पॅटर्न यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जारी करण्यात आलेली आकडेवारी पाहता, आता छोट्या शहरांमधील विद्यार्थी देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांशी चांगली स्पर्धा करीत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातील १० विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण प्राप्त केले आहेत.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालAkolaअकोला