Akola: 56 more corona positive; Total number of patients 6814 | अकोला : आणखी ५६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६८१४

अकोला : आणखी ५६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६८१४

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार २३ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६८१४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २२ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तारफैल, सिंधी कॅम्प व हरिहर पेठ येथील प्रत्येकी पाच, कौलखेड, खडकी, मोठी उमरी येथील तीन जण,सारकिन्ही, रामदासपेठ, जीएमसी येथील प्रत्येकी दोन, सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहत, केशव नगर, कलाल चाळ, माधव नगर, जूना कापड बाजार, न्यु भीम नगर, रेणूका नगर, रणपिसे नगर, बहिरगेट, बाशीर्टाकळी, ख्रिश्चन कॉलनी, गौरक्षण रोड, डाबकी रोड, अकोट, लहान उमरी, मलकापूर, वडाळी देशमुख, देशमुख फैल, जय हिंद चौक, वानखडे नगर, खोलेश्वर, शिवाजी नगर, गीता नगर, दाळंबी, मुर्तिजापूर व पागोरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.


१,८११ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,८१४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,७९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २१३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,८११ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Akola: 56 more corona positive; Total number of patients 6814

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.