अकोल्यात ३९४८ परीक्षार्थींनी दिली एमएच- सीईटी
By Admin | Updated: May 8, 2015 01:43 IST2015-05-08T01:43:56+5:302015-05-08T01:43:56+5:30
६0 परीक्षार्थी अनुपस्थित.

अकोल्यात ३९४८ परीक्षार्थींनी दिली एमएच- सीईटी
अकोला : राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी गुरुवार, ७ मे रोजी शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातील ३ हजार ९४८ परीक्षार्थींनी उपस्थिती लावली असून, ६0 परीक्षार्थी अनुपस्थित होते. एमएच-सीईटी परीक्षेसाठी जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून डॉ. नितीन अंभोरे यांची तर केंद्र प्रमुखम्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सकाळी १0 ते १ दरम्यान शहरातील १५ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जी.एस. कॉन्व्हेंट अँन्ड हायस्कूल, माउंट कारमेल अँन्ड हायर सेकंडरी स्कूल, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, मेहरबानू ज्युनिअर कॉलेज, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल, गुरुनानक विद्यालय, सिंधी कॅम्प, सावित्रीबाई फुले जि.प. माध्यमिक कन्या शाळा, शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, भिकमचंद खंडेलवाल हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज, कोठारी कॉन्व्हेंट, डी.ए.व्ही. इंग्लिश स्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल आदी परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली.