अकोटात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: June 13, 2017 00:52 IST2017-06-13T00:52:06+5:302017-06-13T00:52:06+5:30
अकोट: स्थानिक जवाहर मार्गावरील एका दुकानात काम करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा दुकानाबाहेरील रस्त्यावर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना १२ जून रोजी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

अकोटात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: स्थानिक जवाहर मार्गावरील एका दुकानात काम करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा दुकानाबाहेरील रस्त्यावर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना १२ जून रोजी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
स्थानिक शिवदास नगरमधील रहिवासी असलेला चेतन बाळूभाऊ हरसुलकर हा १५ वर्षीय मुलगा एका दुकानात खासगी काम करतो. १२ जून रोजी रात्री तो दुकानालगतच्या रस्त्यावर खाली पडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप सांगता येत नसून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.