अकाेलेकर बेफिकीर; अतिक्रमकांनी थाटली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:20 IST2021-02-24T04:20:36+5:302021-02-24T04:20:36+5:30
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मनपाच्या भरतीया रुग्णालयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात काेरानाची लागण झालेल्या व ...

अकाेलेकर बेफिकीर; अतिक्रमकांनी थाटली दुकाने
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मनपाच्या भरतीया रुग्णालयात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात काेरानाची लागण झालेल्या व संशयित रुग्णांच्या नाकातील नमुने जमा केले जात आहेत. चाचणीअंती काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. धाेक्याची घंटा लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने ताेंडाला मास्क न लावणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाइचा दंडुका उगारला आहे. त्यासाठी मनपा, महसूल व पाेलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्त पथकांचे गठन करण्यात आले आहे. मंगळवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९० जणांवर तसेच पाच व्यावसायिक प्रतिष्ठानच्या संचालकांजवळून ३८ हजार २०० रुपये दंड वसूल केला.
कारवाइचा धडाका ओसरला!
जिल्हाधिकाऱ्यांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाचे निर्देश दिल्यानंतर मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी कारवाइचा धडाका लावला हाेता. गठित करण्यात आलेल्या पथकांनी सुरुवातीला वसूल केलेला दंड लक्षात घेता वर्तमानस्थितीत कारवाईचा धडाका ओसरल्याचे दिसून येत आहे. पाच पथकांनी दिवसभरात अवघ्या ९० जणांवर केलेली कारवाई लक्षात घेता तीनही प्रशासकीय यंत्रणांनी जागे हाेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अतिक्रमकांची पर्यायी जागेकडे पाठ
शहरातील मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या फेरीवाले, लघु व्यावसायिकांसाठी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी खुले नाट्यगृहामागील जागेत व भाटे क्लबमागील जागेत पर्यायी व्यवस्था करून दिली. या जागेकडे अतिक्रमकांनी पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे. शिवाय आयुक्त दीर्घ रजेवर जाताच अतिक्रमकांनी पुन्हा एकदा रस्त्यालगत दुकाने थाटण्याला प्रारंभ केल्याचे चित्र आहे.
...फाेटाे टाेलेजी...