शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अ‍ॅग्रोेटेक २0१७ : शेतकर्‍यांना घातली आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाने भुरळ; दुसर्‍या दिवशीही प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:53 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधुनिक कांदा चाळणी बघण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी गर्दी करीत आहेत. 

ठळक मुद्देशेतकर्‍यांचा संशोधनाकडे कलकृषी प्रदर्शनात ३00 च्यावर स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधुनिक कांदा चाळणी बघण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी गर्दी करीत आहेत. यंदाच्या कृषी प्रदर्शनात ३00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून आली. कृषी विद्यापीठाने प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र येथे प्रात्यक्षिक स्वरू पात उपलब्ध केले आहेत. शेतकरी बचत गटांच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली. फलोत्पादन शेतीकडे विदर्भातील शेतकरी वळला आहे. उद्यान विद्या विभागाने संशोधित केलेली बीरहित मोसंबी, लिंबू तसेच विविध भाजीपाला पिके ब्रोकोली आदींची माहिती शेतकर्‍यांनी जाणून घेतली. सौर ऊज्रेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली. संरक्षित शेतीच भविष्यात तारणार असल्याने संरक्षित शेतीसाठीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी जल व मृद संधारण विभागाच्या शास्त्रज्ञांकडून जाणून घेतले. हवामान बदल व पावसाची अनिश्‍चितता बघता शेतकरी त्रस्त आहेत. अखिल भारतीय कोरडवाहू संशोधन प्रकल्प विभागाने कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी येथे ठेवले आहे. शेतकर्‍यांनी आस्थेने हे तंत्रज्ञान जाणून घेतले. कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातिवंत गायी, म्हैशी, शेळ्य़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्‍यांनी वळून शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी याठिकाणी शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे. कीटकशास्त्र विभागाच्यावतीने पिकांवर येणारी कीड व त्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता, कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा पादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून दिली जात आहे. राज्यभरातून आलेल्या बचत गटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला विविध शेतमाल शेतकर्‍यांसोबतच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

एका क्लिकवर तण व्यवस्थापनाची माहितीतण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पांतर्गत पीडीकेव्ही वीड मॅनेजर हे अँप विकसित केले असून, ते प्ले स्टोअरमधून घेता येते. विविध पिकांच्या तण व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती, फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती आहे. कोणत्या पिकाला कोणते तणनाशक वापरावे व त्याची मात्रा किती असावी, याची संपूर्ण माहिती अँपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होते. हे अँप डॉ. एस.पी. देशमुख, डॉ. एस.यू. काकडे यांनी विकसित केले.

छाया: २९ सीटीसीएल: 

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर