कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा!
By Admin | Updated: March 17, 2016 02:31 IST2016-03-17T02:31:24+5:302016-03-17T02:31:24+5:30
स्वतंत्र उत्तीर्णचा नियम रद्द करण्याची मागणी.

कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा!
अकोला : कृषी पदवी परीक्षेत 'स्वंतत्र उत्तीर्ण'चा नियम रद्द करावा, यांसह इतर मागण्यांसाठी रासप विद्यार्थी आघाडी व कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष महेश कडुस पाटील यांच्या नेतृत्वात बेधडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कृषी पदवीतील सेपरेट पासिंगचा नियम रद्द झाला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी विदर्भस्तरीय आंदोलन केले होते तसेच राहुरी कृषी विद्यापीठात रासपने आंदोलन केले होते; पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिष्यवृत्ती न देणे व अन्यायकारक नियम कृषी विद्यापीठ लादत असेल, तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकार्यांनी येथे आयोजित सभेत उपस्थित केला आणि यासंबंधीचे निवेदन कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिले. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये परप्रातांतील विद्यार्थ्यांंकडून लाखो रुपये डोनेशन घेतले जात आहे. या सर्व प्रश्नांसह इतर प्रश्न न सोडविल्यास रासप मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी कडुस यांनी सांगितले.
मोर्चात रासपचे प्रदेशाध्यक्ष महेश कडुस, प्रवीण टोम्पे, हर्षदा भदाणे, वाणी तोडासे, गौरव गावंड, मानसी नरांजे, सुमत भाधडे, वैभव मेहरे, शुभम घोडे, अकोला युवकचे सुभाष नप्ते, योगेश खाडे, सचिन राठोड, प्रतीक वानरे, राहुल शर्मा, निनाद पाटील, वैभव मेहरे, निखील गोसावी, मयूर बोंडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.