कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:00 PM2019-01-02T13:00:47+5:302019-01-02T13:00:59+5:30

अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

 Agriculture University has signed a Memorandum of Understanding | कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार

कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार

googlenewsNext

अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.
डॉ. पंदेकृवि अकोलाच्या सुवर्णमोहत्सवी वर्ष आणि अ‍ॅग्रोटेक २०१८ चे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले व रिलायन्स फाउंडेशनचे प्राधिकृत अधिकारी सचिन मार्डीकर यांनी या करारावर स्वाक्षºया केल्या. शेती तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकºयांपर्यंत पोहचून त्यांचे जीवनमान उंचवावे व शेती उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने हा करार करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासोबत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर व रिलायन्स फाउंडेशनचे विजय बारापात्रे, प्रफुल बन्सोड व सचिन मातळे उपस्थित होते.

 

Web Title:  Agriculture University has signed a Memorandum of Understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.