कृषी, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मोबाईल
By Admin | Updated: July 15, 2014 00:51 IST2014-07-15T00:51:58+5:302014-07-15T00:51:58+5:30
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ऑनलाईन परीक्षा सुरू केली आहे.

कृषी, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मोबाईल
अकोला : कृषी क्षेत्रातील परीक्षांचे स्वरू प बदलले असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेने ऑनलाईन परीक्षा सुरू केली आहे. यापुढे या स्पर्धांंना विद्यार्थ्यांंना तोंड द्यावे लागणार आहे. याच पृष्ठभूमीवर कृषीतील उद्यान विद्या या विषयाच्या सराव परीक्षेचे भारतातील पहिले मोबाईल अँप, संकेतस्थळ मंगेश बावीस्कर (बदलापूर, जि. ठाणे) व पूजा चौखंडे (अकोला) यांनी तयार केले आहे. या विद्यार्थ्यांंनी डॉ.पंदेकृवि येथे उद्यान विद्या या विषयात आचार्य पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. कृषी विषयाच्या विद्यार्थ्यांंसाठी हे अँप मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी खास ह्यलोकमतह्णशी बातचित करताना व्यक्त केला. प्रश्न- या अँपमध्ये काय आहे? - उद्यान विद्या व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी हे अँप तयार करण्यात आले असून, सध्या अँन्ड्राईड व्हर्जनच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. हॉर्टिप्लस हे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांंना परीक्षेचा सराव कसा करावा, यासाठीची उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देशातील नामवंत कृषी शास्त्रज्ञांचे लेख व विचार आहेत. प्रश्न- उद्यान विद्याशास्त्राचे कोणते विषय आहेत? - उद्यान विद्या अभ्यासक्रमातील फळशास्त्र, भाजीपालाशास्त्र, फुलशेती, मसाला, औषध व नगदी पिके या सर्वच विषयावरील प्रश्नांचा या अँपवर समावेश करण्यात आला आहे. प्रश्न- या अँपचा विद्यार्थ्यांंना फायदा होईल का? - कृषी विषयाच्या परीक्षेत आमूलाग्र बदल होत असून, या परीक्षा ऑनाईल झाल्या आहेत. इतरही परीक्षा ऑनलाईल होण्याच्या मार्गावर आहेत. या बदलाला सामोरे जाण्यासाठी हे अँप विद्यार्थ्यांंना मार्गदर्शक ठरणार आहे. विशेष म्हणजे या अँपचा लाभ देशातील सर्वच उद्यान विद्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांंनाही घेता येईल. प्रश्न- इतर मोबाईलवर उपलब्ध नाही का? -सध्या अँन्ड्राईड व संकेतस्थळावर आम्ही आहोत. लवकरच सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईलवर सराव परीक्षा व त्याची माहिती टाकणार आहोत. प्रश्न- या अँपचे वैशिष्ट्ये काय ? - या अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न सोडविण्याची सोय आहे. सद्यस्थितीत एक हजार प्रश्न दिले असून, लवकरच चार हजार प्रश्न उपलब्ध होतील. प्रत्येक प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अतिरिक्त माहिती पण या अँपवर दिलेली आहे. महत्त्वाचे प्रश्न जतन करण्याची मुभा असून, ऑफ व ऑनलाईन या दोन्हीची सोय आहे.