कृषी विस्तार अधिका-यास लाच घेताना रंगेहात अटक!
By Admin | Updated: July 27, 2016 01:27 IST2016-07-26T02:00:23+5:302016-07-27T01:27:15+5:30
विहिरीला विद्युत जोडणी मिळण्यासाठी मेजरमेंट बुक व क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी मागीतली होती लाच.

कृषी विस्तार अधिका-यास लाच घेताना रंगेहात अटक!
बाळापूर (जि. अकोला) : नजीकच्या खामखेड येथील शेतकर्याच्या आईच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत खोदलेल्या विहिरीला विद्युत जोडणी मिळण्यासाठी मेजरमेंट बुक व क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणार्या बाळापूर पंचायत समितीमधील एका कृषी विस्तार अधिकार्यास २५जुलै रोजी शेतकर्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. खामखेड येथील सरपंच प्रदीप इंगळे यांना त्यांच्या आईच्या शेतात विहिरीवरील विद्युत जोडणी घेण्यासाठी आवश्यक असलेले मेजरमेंट बुक व क्लिअरन्स प्रमाणपत्र हवे होते; परंतु बाळापूर पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी सुनील गुणवंत गावंडे यांनी त्यांना १५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे त्यांनी त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले.त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक यू.के.जाधव यांनी २५ जुलै रोजी सापळा रचून कृषी विस्तार अधिकारी सुनील गावंडे यांना प्रदीप इंगळे यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. हे वृत्त लिहिपयर्ंत याप्रकरणी गावंडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.