शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कृषी विभागाने केले ४ लाख ८० हजार हेक्टरचे नियोजन

By admin | Updated: May 24, 2017 01:18 IST

खरीप हंगाम आला; शेत मशागतीला वेग!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी पावसाळा वेळेवर आणि मुबलक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांपुढे अनंत आर्थिक अडचणी असताना त्यांनी शेत मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. कृषी विभागानेही यावर्षी जिल्ह्यासाठी खरिपाचे ४ लाख ८० हजार ६०० हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी व आवश्यक ती शेतीची कामे करण्यावर भर दिला असून, अनेक ठिकाणी ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यात उन्हाचा पारा चढताच आहे. या उन्हातही शेतकरी शेतात राबताना दिसत आहे. शेतात ट्रॅक्टरची घरघर दिसत असून, रोटावेटरने शेत सपाट केली जात आहेत. यावर्षी पिकांच्या नियोजनाबाबत शेतकरी दक्षता घेत आहे. यावर्षी तुरीने कंबरडे मोडल्याने शेतकरी तुरीच्या जागी पर्यायी पीक घेता येईल का, या विचारात आहे. यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मूग, उडीद, ज्वारीची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. कापूस व काही ठिकाणी सोयाबीनमध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने तुरीचे आंतरपीक घेत असतात. ते यावर्षीही घेणारच; पण त्यांची याबाबत द्विधा मनस्थिती आहे.दरम्यान, जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत कोटीचे पीक कर्ज वाटप झाले आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रबोधन केले जाणार आहे. शेतकरी जनजागृती आठवडा कृषी विभाग राबविणार आहे. अकोला जिल्ह्यात मागीलवर्षी सोयाबीन या पिकाचे दर फारच कमी होते. दरवाढीच्या प्रतीक्षेत आजही हे बियाणे शेतकऱ्यांनी घरी राखून ठेवले आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन कृषी विभाग ५ टक्के क्षेत्र कमी होत असल्याचे सांगत असला तरी शेतकरी वेळेवर काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे.